कागल मध्ये विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सुशोभीकरण व नूतनीकरण उदघाटन शुभारंभ
कोल्हापूर/प्रतिनिधी : बौद्ध जयंतीनिमित्त छत्रपती शाहू उद्यान, कागल मध्ये विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सुशोभीकरण व नूतनीकरण याचे उद्घाटन शुभारंभ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक नविदसो मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया बाबा माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नगराध्यक्षा माणिक माळी (वहिनी), उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक चंद्रकांत गवळी, विवेक लोटे, सौरभ पाटील, प्रविण काळबर,सौ. मोरबाळे वहिनी, संजय चितारी, संग्राम लाड, अजित कांबळे, भगवान कांबळे, सुरेश कांबळे, तुषार भास्कर, बच्चन कांबळे व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.