‘आई माझी काळुबाई’ मालिकेत आर्याच्या भूमिकेसाठी प्राजक्ता गायकवाडने
घेतली विशेष मेहनत
कोल्हापूर/प्रतिनिधी : नवीन मालिका, सिनेमा, नाटक म्हटलं की त्यातील पात्रानुसार कलाकारांना स्वत:मध्ये बदल करावेच लागतात. क्वचित, कधी तरी आपण जसे आहोत तसेच पात्रं असल्यामुळे बदल करण्याची आवश्यकता नसते. पण ब-याच प्रमाणात पात्रानुसार बदल करणे देखील गरजेचे असते, कारण कलाकारांना पात्रात पूर्णपणे शिरल्याशिवाय जमेना आणि म्हणूनच तर प्रेक्षकांना कलाकारांचा अभिनय भूमिकेसह कायमस्वरुपी लक्षात राहतो.
सोनी मराठीवरील ‘आई माझी काळुबाई’ या नव्या मालिकेतील आर्या हे पात्रं साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने देखील तिच्या नव्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. यापूर्वी प्राजक्ताला अनेकांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत पाहिले आहे आणि तिने साकारलेल्या ‘महाराणी येसूबाई’ च्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड प्रेम दिले. ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर पौराणिक कथा पण कॉलेज तरुणीची भूमिका करणे हे थोडं फार चॅलेंजिंग नक्कीच ठरले असेल. आतापर्यंत पाहिलेली प्राजक्ता आणि आता नवी मालिकेत दिसणारी प्राजक्ता या दोघींमध्ये फार फरक आहे. प्राजक्ताचा एक नवा आणि वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. आर्याच्या भूमिकेसाठी प्राजक्ताने वजन कमी केलं असून हेअर स्टाईल सुद्धा बदलली आहे. नवीन पात्रं साकारताना माझ्याकडे आर्या या भूमिकेतूनच पाहिलं जाईल असा विचार करुन प्राजक्ता या पात्रासाठी विशेष मेहनत घेत आहे.
आर्याची उर्फ प्राजक्ताची नवी मालिका ‘आई माझी काळुबाई’ १४ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे सहकुटुंबासोबत नक्की पाहा फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.