मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरूण मंडळाच्या वतीने मोजक्याच महिलांच्या उपस्थितीत शिवजन्म काळ संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठेतील सर्व तालीम संस्था ,तरुण मंडळे यांची शिखर संस्था मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने मिरजकर तिकटी चौकात शासकीय नियम पाळून सौ सुशीला देसाई , सौ लता डवरी ,वासंती घोरपडे ,सौ दिपाली धनवडे ,सौ शिल्पा सरवदे ,सौ सुशीला देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पाळणा म्हणण्यात आला . तसेच ध्वज वंदन शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव देवणे यांच्या शुभहस्ते झाले .त्याप्रसंगी मंगळवार पेठेतील सर्व तालीम संस्थेचे प्रतिनिधी तसेच बाबुराव चव्हाण , आनंदराव पायमल , अशोक पवार , रमेश मोरे ,संदीप चौगुले ,बापू आवळे , बाबा पार्टे , पप्पू सुर्वे , सतीश जोशी , किरण पवार , विजय पवार , सुनील पाटील , जयकुमार शिंदे , शैलेश साळुंखे ,संजय साळुंखे , इत्यादी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते .