शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर
कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान ,कोल्हापूर ( महाराष्ट्रप्रांत ) तर्फे आज १ मे २०२१ रोजी महाराष्ट राज्य वर्धापन दिनी आगळ्या पद्धतीने पुरुष व महिला मिळून सुमारे ९१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादात रक्तदान करून शिवरायांना मानवंदना दिली.
या वेळी आज मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान ने शिवदान- रक्तदान अंतर्गत कोवीड योध्हा उपक्रम देवकर पाणंद पांडुरंग नगरी येथील पांडुरंगाच्या मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित केलं.
अर्पण ब्लड बॅक, कोल्हापुर यांच्या सहयोगाने पार पडलेल्या या शिबिरासाठी मराठा तितुका मेळवावा ,प्रतिष्ठान, कोल्हापूर ,(महाराष्ट्र प्रांत) चे संस्थापक-अध्यक्ष : श्री.रणजित निवासराव घरपणकर , कार्यप्रमुख श्री.रोहित देसाई , व योगेश केरकर खजाणीस श्री.अनिष पोतदार
महिला संघटन प्रमुख सौ.संजिवनी देसाई , सदस्य श्री.तेजस आहेरराव, श्री.प्रवीण पाटील श्री.मंजुनाथ स्वामी, श्री.सचिन पाटील, श्री.अमर पाटील, कु.संगीता तांबे उपाध्यक्ष विनायक करंबे , सेक्रेटरी अनिल चिले ई.पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. डाॅ प्रकाश गाडवे, माधव ढवळीकर, पुजा मॅडम, संकपाळ आदी नि शिबिर पार पाडले .