महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत – जयंत पाटील
महाराष्ट्र दिनाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी – सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला आणि कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत.डॉक्टर व आरोग्य सेवेतील प्रत्येकजण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहे. जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल हे नक्की असे सांगतानाच संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच कोरोना विरुध्द लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना जयंत पाटील यांनी आदरांजली वाहिली आहे.