पदमा गादी कारखाना यांच्यावतीने महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी १० गाद्यांचा सेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी गाद्या, उश्या, बेडशीट, पिलो कव्हर व चादर असा १० गाद्यांचा सेट महापालिकेकडे पदमा गादी कारखान्याचे मालक प्रकाश नारायण पाटील(मळगेकर) यांनी दिला. सदरचे साहित्य महापालिकेच्या कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे प्रकाश पाटील यांनी दिले. कोरोना आजाराच्यापार्श्वभूमीवर कोल्हापूरमहानगरपालिकेच्यावतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याबाबत कोल्हापूरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरीकांस महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन पदमा गादी कारखाना यांनी १० गाद्यांचा सेट दिला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे आदी उपस्थित होते.