Friday, December 20, 2024
Home ताज्या रामनवमीचा मुहूर्त साधत कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन करत राजर्षि शाहू आघाडीचा प्रचार शुभारंभ

रामनवमीचा मुहूर्त साधत कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन करत राजर्षि शाहू आघाडीचा प्रचार शुभारंभ

रामनवमीचा मुहूर्त साधत कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन करत राजर्षि शाहू आघाडीचा प्रचार शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी :  नुकत्याच होऊ घातलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर आमदार पी. एन पाटील जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक व जेष्ठ संचालक अरुण नरके हे नेतृत्व करत असलेल्या सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीचा प्रचार शुभारंभ आज सकाळी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथे संस्थापक  कै. आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करण्यात आले.
काल सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीची घोषणा होताच आज सर्व उमेदवारांनी गोकुळ येथे संस्थापक कै. आनंदराव पाटील – चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवाद करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके यांनी सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात एकत्रितरित्या काम करून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे असून पुन्हा एकदा गोकुळ वर आपला झेंडा फडकवायचे असल्याचे सूतोवाचन केले.
यावेळी गोकुळ चे चेअरमन रवींद्र आपटे , माजी चेअरमन जेष्ठ संचालक  रणजितसिंह पाटील, जेष्ठ संचालक विश्वास जाधव तसेच संचालक धैर्यशील देसाई, दिपक पाटील,पी.डी.धुंदरे, उदय  पाटील,बाळासो खाडे, अंबरीशसिंह घाटगे,  सत्यजित पाटील,विलास कांबळे संचालीका अनुराधा पाटील याच बरोबर नवउमेदवार सदानंद  हत्तरकी,चेतन  नरके ,धनाजीराव  देसाई, प्रकाशराव चव्हाण , प्रतापसिंह पाटील, राजाराम भाटळे, रवीश पाटील, रणजीत  पाटील, व शौमिका महाडिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments