गोकुळ निवडणुकीसाठी विरोधी आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी असलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने उमेदवारांची नावे आज पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत. सत्तारूढ गटातून बाहेर पडलेले विश्र्वास पाटील, अरूण डोंगळे, शशिकांत पाटील – चुयेकर यांना उमेदवारी मिळालेली आहे.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद, माजी आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह, आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता, खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र यांचा समावेश आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.विरोधी आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, माजी आम. के. पी. पाटील, माजी आम. चंद्रदीप नरके, माजी आम. संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, मारुती जाधव यांची उपस्थिती होती.
सर्वसाधारण गटातील उमेदवार – विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील – चुयेकर, एस. आर. पाटील, प्रकाश रामचंद्र पाटील, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, नविद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, रणजितसिंह कृष्णराव पाटील, अभिजीत तायशेटे, नंदकुमार ढेंगे, किसन चौगले, बाबासाहेब चौगुले, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगुले, इतर मागासवर्गीय गट – अमरसिंह यशवंत पाटील, भटक्या विमुक्त जाती जमाती – बयाजी शेळके अनुसूचित जाती