गोकुळसाठी सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारुढ आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांच्यासह बारा संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. चेतन अरूण नरके, सदानंद राजकुमार हत्तरकी व शौमिका अमल महाडिक यांच्याही नावाचा समावेश आहे.
सत्तारुढ आघाडीचे नेते आमदार पी.एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सत्तारुढ गटाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यावेळी माजी मंत्री भरमू पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे उपस्थित होते.
सर्वसाधारण गटातील उमेदवार : चेअरमन रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय निवासराव पाटील, सत्यजित सुरेश पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवकर, प्रतापसिंह शंकरराव पाटील, प्रकाश चव्हाण, राजाराम भाटले, रणजित बाजीराव पाटील
इतर मागासवर्गीय गट – पांडुरंग दाजी धुंदरे. भटक्या विमुक्त जाती जमाती – विश्वास जाधव अनुसूचित जाती जमाती गट – विलास कांबळे.महिला गट – अनुराधा पाटील, शौमिका महाडिक.