Sunday, November 10, 2024
Home ताज्या प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचे पुण्यात निधन

प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचे पुण्यात निधन

प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचे पुण्यात निधन

पुणे/प्रतिनिधी : प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे (वय ७८) यांचे आज दि. १९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं पुण्यातील, तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे. पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱ्या एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, संहिता, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट गाजले. ‘दिठी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; तर अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन तेंडुलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले.
भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी...

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त...

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर...

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे...

Recent Comments