जिल्हा वार्षिक योजना व राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीतून विकास कामांकरीता सात कोटी रु. मंजूर- खासदार संजय मंडलिक
कोल्हापूर/प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये व जिल्हा वार्षिक योजनेमधून चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यासाठी सुमारे सात कोटी रु. चा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले,राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ले धनगरवाडा येथे गेल्या पावसाळ्यात रस्ता व्यवस्थित नसलेकारणाने गरोदर महिलेस औषधोपचार वेळेत न मिळाल्याकारणाने प्राण गमवावा लागला होता. याकरीता आवश्यक बाब म्हणून म्हासुर्ले ते सावतवाडी ते मधला धनगरवाडा जोड रस्त्यावरील ०/५०० किमी मध्ये ओढ्यावर साकव बांधणेकरीता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३५ लाख रु. मंजूर केल्याने म्हासुर्ले पैकी मधला धनगरवाडा, पादुकाचा धनगरवाडा, राणग्याचा धनगरवाडा येथील नागरीकांची दवाखाना, बँका, बाजार आदीकरीता जवळचा बारमाही मार्ग होणार आहे. तसेच राधानगरी धरण स्थळावर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जलसिंचनाच्याबाबतीत दुरदृष्टीने सुमारे १०० वर्षापुर्वी राधानगरी धरण हा देशातील त्यावेळच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा पाटबंधारे प्रकल्प उभा केल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हरितक्रांती होवून जिल्हा सुजलम्-सुफलम् झाला. राधानगरी धरण हे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असलेने याठिकाणी देशभरातील हजारो पर्यटक या धरणास भेट देत असतात. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी धरण निर्मीतीचे ऐतिहासीक कार्य केले याबाबतची माहिती या पर्यटकांना मिळावी म्हणून याठिकाणी केंद्र परिसर सुधारणा व बागबगिचा करणे तसेच धरण स्थळावर दगडी फरशी बसवून विद्यूतीकरण करणे याकरीता ५० लाख रु. चा निधी पर्यटन स्थळांचा विकास अंतर्गत मंजूर झाला आहे.राज्याच्या चालू वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ६ कोटी रु. मंजूर झाले असून यामध्ये चंदगड तालुक्यातील रामा १८० ते कानूर – कुरणी – गवसे – इब्राहिमपूर – अडकूर ते रामाक्र १८९ ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र ६६ किमी ३/०० ते ४/००, ५/०० ते ६/००, ७/५०० ते ११/५०० व १३/०० ते १५/५०० मध्ये सुधारणा करणे व गटर्स करणे याकरीता १ कोटी १० लाख रु. तर राष्ट्रीय महामार्ग क्र ४ ते कवळीकट्टी, दड्डी ते राजगोळी कुदनूर – कालकुंद्री – कागणी प्रजिमा ६१ ते किणी – नागरदळे – कडलगे – ढोलगरवाडी – मांडेदुर्ग – कार्वे ते रामाक्र १८० ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र ६५ किमी ११०० ते ३४/५०० किमी ११/०० ते १२/७००, १३/८०० ते १४/००, १४/२०० ते १५/००, १६/७०० ते १८/५०० व २०/०० ते २२/०० मध्ये सुधारणा करणे करीता ३ कोटी रु. तर रामा १८९ पासून भडगांव – चन्नेकुप्पी – नूल बसर्गे रामाक्र २०१ ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र ५७ किमी ०/०० ते १/०० (भाग ०/०० ते २/५५०, ४/००० ते ४/५००, ७/१०० ते ७/५५०, १४/०० ते १५/४०० MDR ५७ मध्ये सुधारणा करणे करीता १ कोटी १० लाख तर आजरा तालुक्यातील रामा १८८ ते भादवण, पेद्रेवाडी – कोवाडे – मलिग्रे – कागिनवाडी – कोळिंद्रे ते प्रजिमा ६२ ला मिळणारा रस्ता प्रजिमा ८२ किमी १५/५०० ते १५/८०० १९/५०० ते १९/९०० ची रुंदीकरणासह सुधारणा करणे करीता ७५ लाख रु. चा निधी मंजूर झाल्याची माहीती खासदार मंडलिक यांनी दिली.