खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धेसाठी १९ संपर्क अधिका-यांची नियुक्ती
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हयामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यासाठीप्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजनाकरण्यात येत आहेत. जिल्हयामध्ये तसेच शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असलेनेखाजगी हॉस्पिटलमध्येही कोवीडवरउपचार सुरु करण्यात आलेले आहेत. शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धेकरीता प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांनी १९ संपर्क अधिकारीऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.या संपर्क अधिकाऱ्यांवर व खाजगी हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप-आयुक्त, सहा.आयुक्त व पर्यावरण अभियंता अशा ७ नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्त केलेली आहे.
यामध्ये जानकी नर्सिंग होम व सिटी हॉस्पिटलसाठी अधिक्षक श्रीमती.तेजश्री शिंदे (९८६०७२५६७३), श्री साई कार्डी ॲक सेंटर व मोरया हॉस्पिटल येथे वरिष्ठ लेखापरिक्षक दिपक कुंभार (८४४६७००९००), सचिन सुपर स्पेशॅलिटी व सिद्धीविनायक कॉनकोर्डन्स हॉस्पिटलसाठी सहा.अधिक्षक बळवंत सुर्यवंशी (९७३०५१३६८०), सिद्धीविनायक हार्ट हॉस्पिटल व ॲस्टर आधार हॉस्पिटलसाठी सहा.अधिक्षक श्रीमती प्राजक्ता चौगुले (८३९०३९७२२५), मंगलमूर्ती हॉस्पिटल व व्यंकटेश्वरा हॉस्पिटलसाठी कनिष्ठ लिपीक अवधुत पलंगे (९८२२११०४९०), केपीसी हॉस्पिटल, सरस्वती मेडीसिटी व सुर्या हॉस्पिटलसाठी आस्थापना अधिक्षक सागर कांबळे (९९२३६२२१५०), मेट्रो हॉस्पिटल व वेस्टर्नइंडिया इंन्स्टिट्युट ऑफन्युरो सायन्सेस (विंन्स) साठी अधिक्षक विलास साळोखे (९४२११११३२५), डायमंड सुपरस्पेशॅलीटी हॉस्पिटल व अंतरंग हॉस्पिटलसाठी कनिष्ठ अभियंता सुरेश व्ही पाटील (८९९९५५८५४३), कृपलानी हॉस्पिटल, रत्ना मेडीकेअर सेंटर व केळवकर हॉस्पिटलसाठी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल (९८३४१५०२५०), कुकरेजानर्सिंग होम व ट्युलिप हॉस्पिटलसाठी कनिष्ठ अभियंता मीरा नगीमे (७२१८४१२६९६), ॲपेक्स हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल व सनराईज हॉस्पिटलसाठी वरिष्ठ लिपीक विजय वणकुद्रे (७७०९०४२१७२), कोल्हापूर ऑर्थोपेडीक इन्सिट्युट व ॲपल सरस्वती हॉस्पिटलसाठी कनिष्ठ अभियंता सुरेश पी. पाटील क.अभियंता (७७०९०१९२९२), पल्स हॉस्पिटल व निरामय हॉस्पिटलसाठी सहा.सांखीकी अधिकारी संजय कुंभार (७०२०५४४८९८), डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेज व अथायु हॉस्पिटलसाठी लेखापाल बाबा साळोखे (९८२२८४६८०४), विजय हॉस्पिटल व साई नर्सिंग होमसाठी प्र.नगरसचिव सुनिल बिद्रे (९८९०३०१८६१), वालावलकर हॉस्पिटल, नॉर्थस्टार हॉस्पिटल व नारायणी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलसाठी प्रताप माने (९७६६४५६४६४), कृष्णा हॉस्पिटल व श्री हॉस्पिटल, विमल मेडीकलसाठी वरिष्ठ लिपीक प्रदीप व्हरांबळे (९६७३७३३०३३), कपिलेश्वरनर्सिंग होम व गंगाप्रकाश हॉस्पिटलसाठी वरिष्ठ लिपीक सागर सारंग (८४४६५२१२१२), दत्तसाई हॉस्पिटल, श्रावस्ती हॉस्पिटल व सद्दगुरु मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलसाठी वरिष्ठ लिपीक सागर सुतार (९३०९५३३०८४) यांची खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांस बेड उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त-१ विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, पर्यावरण अधिकारी समीर व्याग्रांबरे याची या सर्वावर नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे.