बाहेरून येणाऱ्या नागरिकांना सात दिवस संस्थात्मक अलगीकरणं व्हावे लागणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्याच आता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा बाहेर जायचं असेल किंवा जिल्ह्यात पुन्हा यायचं असेल तर नागरिकांनी सात दिवस अलगीकरण करणे सक्तीचे केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येताना आरटी-पीसीआर अहवाल पंधरा दिवसाच्या आतील असणे गरजेचे आहे. जर नागरिकांनी कोरोनाचे दोनही डोस घेतले असतील त्यांना हा नियम लागू राहणार नाही असे सुद्धा जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले आहे.