संवेदना सोशल फाउंडेशन च्या वतीने पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे १००० एन ९५ मास्क सुपूर्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : संपुर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून कार्यरत असतात. सततच्या या कामामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात काम करताना संवेदना फाउंडेशन च्या वतीने एन ९५ मास्क मिळणेबाबत पोलिस प्रशासनाच्या वतीने विचारणा झाली. त्यास त्वरित प्रतिसाद देत जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने माजी महसुल मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या संवेदना सोशल फाउंडेशन च्या वतीने संवेदना सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे १००० एन ९५ मास्क सुपूर्त करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, जिल्हा विशेष शाखा
पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे उपस्थित होते.