कोरोना टेस्टिंगसाठी नागरिकांनी पुढे यावे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांचे आवाहन
कोल्हापूर/(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात कोरोना साथ रोग प्रतिबंधासाठी नागरीकांनी टेस्टिंगसाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील कोरोना तपासणी साठी स्वॉब नमुने जास्तीत जास्त घेणे गरजेचे असताना नागरिक टेस्टींगसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे विषाणू संसर्ग झपाटयाने वाढू शकतो. यासाठी अतिजोखमीचा गट (super sprader) , कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले, सर्दि, ताप, खोकला लक्षणे असलेले, प्रतिबंधीत क्षेत्रातील व सारी सारखे लक्षणे असलेले रुग्ण यांनी स्वता:हुन स्वॉब तपासणी करुन घेणेसाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे निदान करणे सोपे होईल व आपले नातेवाईक ,कुटुंबीय, मित्रपरिवार, जेष्ठनागरिक, सुरक्षीत राहतील.
स्वॉब तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविघालय, आय.जी.एम. इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, सर्व तालुक्यातील कोवीड काळजी केंद्रे, ॲस्टरआधार हॉस्पीटल कोल्हापूर, डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, अंबिका लॅबरोटरी कोल्हापूर, जीवन लॅबरोटरी, कोल्हापूर, या ठिकाणी तपसाणी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने स्वॉब टेस्टिंगसाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये कोवीड प्रार्दुभाव वाढत आहे प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी जास्तीत जास्त लोकांनी स्वॉब नमुने तपासणी करणे गरजेचे आहे. कोवीड निदानासाठी आर.टी. पी.सी.आर. व रॅपीड ॲन्टीजन टेस्ट अत्यंत महात्वाची आहे. कोवीड चाचणीचे प्रमाण वाढल्यास रुग्णांस निश्चित निदान होवून सत्वर उपचार मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांचा आजार बळवणार नाही आणि इतरांना संसर्ग होणार नाही. पर्यायाने पॉझिटिव्ह रेट व मृत्यूदर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होणार आहेत. जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ मध्ये २९१६६ इतके स्वॉब नमुने घेतले होते तर ४३१ इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. तर फेब्रुवारी २०२१ मध्ये २६०२० इतके स्वॉब नमुने घेतले होते तर ६०१ इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. ३० मार्च २०२१ अखेर ३५४३८ इतक्या रुग्णाने स्वॉब नमुने घेतले असून १४५८ इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत असून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे कडक प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्या बाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव परत मोठया प्रमाणात वाढू नये यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाया योजना राबविण्यात येत आहे. रात्रीची संचार बंदी, मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकावर दंड आकारणे, सामाजिक अंतर पालन करणे, धार्मिक, सामाजिक, राजकिय कार्यक्रमावर बंदी, No Mask, No Entry इ. उपाय योजना राबविण्यात येते आहेत.