होळी पौर्णिमेचा सण सामाजिक रीत्या साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर शहरा मधील विविध गरजवंतलोकांना १०० हून अधिक पोळ्या वाटण्यात आल्या एक घर एक पोळी दान स्वरूपात द्यावी अशी आव्हान आम्ही केले होते या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून परिसरातील प्रत्येक घरामध्ये एक पोळी देण्यात आल्या या पोळी आम्ही कोल्हापूर शहरांमधील रेल्वे स्टेशन ,स्टँड परिसर ,भवानी मंडप अशा विविध ठिकाणी जाऊन गरजवंतलोकांना पोळी वाटण्यात आल्या, यावेळी परिसरातील तसेच परिसराच्या बाहेर राहणाऱ्या लोकांनी देखील फार अधिक संख्या ने पोळी स्वरुपात मदत केली यावेळी उपस्थित तानाजी सुतार, मिलिंद रायजाधव, सुजित सुतार, तेजस जिरगे ,रणजीत जगताप ,कल्पक चिले, स्वयंभू आडनाईक ,सिद्धांत सरनाईक, अधिराज पाठक, आदित्य कुलकर्णी, पवन डाले, पार्थ बोरकर आदी उपस्थित होते.