Saturday, December 21, 2024
Home ताज्या कोल्हापूर महानगरपालिकेचे १०८५ कोटींचे आपले बजेट सादर

कोल्हापूर महानगरपालिकेचे १०८५ कोटींचे आपले बजेट सादर

कोल्हापूर महानगरपालिकेचे १०८५ कोटींचे आपले बजेट सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२०-२०२१ चे सुधारित व २०२१-२०२२ चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार आज पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. आपले बजेट २०२१-२०२२ या संकल्पनेवर आधारित हे अंदाजपत्रक आहे हे आपले बजेट तयार करताना शहरातील नागरिकांकडून थेट अपेक्षा सूचना जाहीर प्रसिद्धीकरण करून मागविण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना व्यक्ती व्यापारी संघटना यांच्याशी थेट चर्चा करण्यात आली आहे. विविध पक्षांचे व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी ही आपल्या नागरिकांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत या सर्वांचा विचार या बजेटमध्ये करण्यात आल्याचे आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महसुली भांडवली व विशेष प्रकल्प वित्त आयोग मिळून एकूण रुपये १०८५ कोटी ४८ लाख रुपये इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२१-२०२२ चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात अव्वल शिल्लकेसह महसुली व भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये ६२३ कोटी ४८ लाख रुपये असून ६२१ कोटी ९६ लाख अपेक्षित आहे. तसेच विशेष प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामांची जमाखर्चाचे स्वतंत्र अंदाजपत्र सादर करण्यात आले असून त्यामध्ये जमा रुपये ३९६ कोटी ४९ लाख अपेक्षित असून खर्च रुपये ३९० कोटी ४७ लाख इतके अपेक्षित आहे महिला व बालकांना निधी व केंद्रीय वित्त आयोगाचे एकत्रित स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आली आहे. वित्त आयोगअंतर्गत एकूण जमा रुपये ६५ कोटी ५१ लाख अपेक्षित असून खर्च रुपये ६४ कोटी १७ लाख अपेक्षित आहे.
अंदाजपत्रकामधील ठळक बाबींमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे,हेरिटेज वास्तू संवर्धन/ हेरिटेज वॉक, पर्यटन स्थळे, सेंटर पब्लिक अनाउन्सिंग सिस्टीम, उद्यानांचा विकास, सेन्सरी गार्डन,हरीत पटे/वने विकसित करणे, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज, आयटी पार्क विकसित करणे,लिकेज डिटेक्शन प्रोग्रॅम,कोटीतीर्थ तलाव पुनरुज्जीविकरण, अग्निशमन यंत्रणा मनपा हॉस्पिटल, प्रशासकीय इमारती,ट्रॅफिक सिग्नल, सिंक्रोनायझेशन ट्रॅफिक मॅनेजमेंट/पट्टे मारणे, क्रीडा विषयक बाबींसाठी उत्तेजन व क्रीडा स्पर्धा,ई-गव्हर्नस, डिजिटायझेशन, मनपा मोबाईल ॲप, ऑनलाइन पेमेंटस, सोशल मीडिया पेजीस, झोपडपट्टी येथे फिरते दवाखाने सुविधा देणे, आरोग्य सुविधा श्रेणी वाढ, सावित्रीबाई फुले व पंचगंगा हॉस्पिटल सुधारणा,फेरीवाला झोन सुविधा, रस्ते, फुटपाथ,मॅनहोल,ग्रेड सेप्रेशन सुविधा, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पंचगंगा नदी प्रदूषण रोखणे, केंद्र शासन अनुदान प्रकल्प अंमलबजावणीमध्ये महालक्ष्मी मंदिर परिसर विकास प्रकल्प सध्या सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्प पूर्तता मध्ये काळम्मावाडी थेट पाईपलाईन अमृत अभियानांतर्गत मलनिस्सारण योजना, पाणीपुरवठा वितरण योजना, राज्य अनुदाना मधून प्रस्तावित प्रकल्पांमध्ये सेफ सिटी प्रकल्प टप्पा २ केशवराव नाट्यगृह परिसर विकास टप्पा २ महानगरपालिकेच्या प्रस्तावित अंदाजपत्रकामध्ये मार्गदर्शक सूचनांनुसार निववळ महसुली उत्पन्नाच्या ५ टक्के निधी महिला व बालकल्याण कार्यक्रमासाठी अपंग कल्याण कार्यक्रम ५ टक्के व मागास निधी ५ टक्के आरक्षित करण्यात आला आहे. अत्यावश्यक व बंधनकारक खर्चाच्या सर्व तरतुदी अंदाजपत्रकामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच वित्त आयोग यामधील निधी शासनाचे विनियोग विषयक निर्णयानुसार खर्च प्रस्तावित आहेत. पाणी दरवाढ बाबत विचारले असता महापालिकेला उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही गरीब जनतेला जादा आकारणी करणार नाही जे कोणी २० हजार लिटरपेक्षा जास्त पाणी वापरतील त्यांनाच आम्ही ज्यादा आकारणी करणार असल्याचे आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.यावेळी महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments