जमिआत उलमा ए महाराष्ट्र वतीने महापुरातील गरजुना ४६ पुर्ण नवीन घरे बांधून देण्यासह २० घराची पडझडीच्या कामाची परिपुर्ती
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाभयंकर प्रलयकारी महापुराने सन २०१९ साली सर्वात जास्त नुकसान शिरोळ तालुक्यात व इचलकरंजी सह कोल्हापूर शहरातही आनेकाना बसला. या वेळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेली व सध्य स्थितीत मानवतेची सेवा करणारी एक धार्मिक संघटना जमिअत उलमा ए हिंद ( मौलाना अर्शद मदनी ) ची राज्य शाखा जमिअत उलमा ए महाराष्ट्र अश्या वेळी मदतीला धाऊन गैली स्थानिक कोल्हापूरच्या संघटने बरोबर फिरून त्यांनी सर्वेक्षण केले . त्यामध्ये १४३ घरे पूर बाधित आढळून आलीत . त्यातील ४६ घरे पूर्ण बांधून देणे व २० घरांची झालेली पडझड दुरुस्त करून देणे असा निर्णय घेतला गेला . याचा खर्च सुमारे पाऊण कोटी रुपये होतो . हे काम आज पूर्णत्वास जात आहे . आभाळाएवढे संकट कोसळलेल्या च्या मदतिसाठी एक पैंगबरास अपेक्षित काम म्हणूनच सामाजिक बांधिलकीस व माणुसकीचा ठेवा जपण्यासाठीच सामाजिक बांधिलकीतून हे घर बांधकामाचे मोठे आहवान आम्ही यशस्वीपणे पुर्णत्वास नेले , यांचे श्रेय आमच्या संस्थेच्या पादरर्शी,समर्पित आणि नेमक्या गरजू पर्यत नेमकेपणे मदत पोहचविण्याच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवून मदत करणारे तमाम लहान थोरा देगणीदारानाच आहे, आम्ही फक्त नाममात्रच आहोत, भविष्यातही समाजातील गरजू – नाही रे वर्गौसाठी आम्ही यथाशक्ती मदतीसाठी नेहमीच एक समन्वयक – ऊत्प्रेरक म्हणून नम्रतेने कार्यरत राहूच , असा दृढ विश्वासही संस्थेच्या जिल्हाध्यक्ष मुफ्ती इम्रान कास्मी सह हाजी अस्लम सय्यद ( जिल्हा सरचिटणीस ) मौ.अझहर सय्यद ( शहराध्यक्ष ) गुलाब मुजावर ( जिल्हा सचिव )सह संचालक तसेच मुस्लिम बोर्डिंग अध्यक्ष गणी आजरेकर आणि तमाम क्रियाशील सभासदासह व्यक्त केला आहे. महापुरासह कौरोना काळातही आलेल्या अनुभवातून कोणत्याही आपत्तकालीन परिस्थितीत प्रशिक्षित कार्यैकर्तै असणारे मनुष्यबळच अधिक प्रभावीपणे- सुनियोजितपणे काम करु शकतेच, हे प्रकर्षौने जाणवले आहे , त्या मुळेच असे प्रशिक्षण देण्यासह कोरोना संदर्भाने लढण्यासाठी सकारात्मकता वाढविणारे , कोरोना संकटातूनही नव नविन संधी शोधणारी समुपदेशक साखळी तयार करण्याचाही जमिअत ऊलमा ए हिंद आणि ऊपशाखा जमिअत ऊलमा ए महाराष्ट्र या दोन्ही संस्थाचा मानस असून त्या मध्ये समाजातील ईच्छुकानी सहभागी व्हावे , असे आहवानही दोन्ही संस्थाच्या मदतीने करण्यात येत आहे.