Sunday, December 22, 2024
Home ताज्या वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ

सांगली/प्रतिनिधी : वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमागधारकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यास ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उप आयुक्त चंद्रकांत टिकुळे यांनी दिली आहे.
राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना २१ डिसेंबर २०१८ अन्वये वीजदर सवलत लागू केली आहे. वीजदर सवलतीला पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https:www.dirtexmah.gov.inवेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत देण्यात आली होती. मात्र उद्योग संघटना, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात येत आहे. यंत्रमाग घटकांनी ३१ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन श्री. टिकुळे यांनी केले आहे.
नोंदणी केलेली नसल्याने २७ अश्वशक्तीपेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांनी ऑफलाईन सादर करावयाचे अर्ज वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून आयुक्त वस्त्रोद्योग, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे सादर करू शकतात.
मुदतवाढीमध्ये संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज सादर न केल्यास वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असेही श्री. टिकुळे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments