Monday, July 15, 2024
Home ताज्या विशाळगडावर झालेली इस्लामी अतिक्रमणे हा छत्रपती शिवरायांचा अपमानच; अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास...

विशाळगडावर झालेली इस्लामी अतिक्रमणे हा छत्रपती शिवरायांचा अपमानच; अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार – सुनील घनवट यांचा इशारा

विशाळगडावर झालेली इस्लामी अतिक्रमणे हा छत्रपती शिवरायांचा अपमानच;
अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार – सुनील घनवट यांचा इशारा

कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहेत. तेथील विविध स्मारके ही पराक्रमाची साक्ष देणारी प्रेरणास्थाने आहेत. हिंदवी स्वराज्याचा वारसा असणार्‍या या गडकिल्ल्यांसाठी अनेक शूरवीर मावळ्यांनी रक्त सांडले. या गडकिल्ल्यांवर गेल्यावर आजही आपल्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटून उर भरून येते. अशांपैकीच एक असलेला म्हणजे विशाळगड ! ३५० वर्षांनंतरही ऊन, वारा, पाऊस आणि मानवी आक्रमणे यांना तोंड देत आजही उभा आहे; मात्र शिवछत्रपतींचा हा अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरावस्थेत आहे. या गडावर ६४ हून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. ज्या शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या पराकम्राची साक्ष या भूमीत आहे, त्यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता आहे, दर्ग्याचे आर्.सी.सी. बांधकाम झाले आहे. हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. हे षड्यंत्र आम्ही कदापि सहन करणार नाही. विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणे ही छत्रपती शिवरायांचाच अपमान असून ही अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास याविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याची चेतावनी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ता श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कृती समितीचे सदस्य श्री. संभाजीराव भोकरे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), मलकापूर येथील श्री. चारुदत्त पोतदार, शिरोली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव (उपसरपंच शिवसेना)
श्री. प्रमोद सावंत, श्री. किशोर घाटगे, श्री. रमेश पडवळ, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन, कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे हेही उपस्थित होते.या वेळी बाबासाहेब भोपळे म्हणाले की, शिवछत्रपतींच्या विशाळगडाच्या दुरावस्थेला कारणीभूत पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गडावरील अतिक्रमणे एक महिन्यात हटवून दुर्लक्षित वीरपुरूषांची स्मारके आणि मंदिरे यांचा शासनाने जीर्णोद्धार करावा, अशा मागण्याही शिवशाहीचा आदर्श सांगणार्‍या राज्य शासनाकडे करत आहोत असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments