Friday, July 19, 2024
Home ताज्या केडीसीसी बँकेत महिलादिन उत्साहात साजरा,महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहात

केडीसीसी बँकेत महिलादिन उत्साहात साजरा,महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहात

केडीसीसी बँकेत महिलादिन उत्साहात साजरा,महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने बँकेने जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ संचालिका श्रीमती डॉ. निवेदिता माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
संचालक श्रीमती उदयानीदेवी साळुंखे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
भाषणात माजी खासदार श्रीमती निवेदिता माने म्हणाल्या, आर्थिक सक्षमीकरणातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केडीसीसी बँक सदैव महिलांच्या पाठीशी असेल. बँकेच्या संचालिका श्रीमती उदयानीदेवी साळुंखे म्हणाल्या,  उद्योग उभारणीतून स्वावलंबनासाठी महिला जर दोन पाऊल पुढे आल्या तर बँक त्यांच्या सहकार्यासाठी चार पाऊल पुढे येईल. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने म्हणाले, बचत गटांच्या मागणीनुसार उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी अल्प व्याजदरातील कर्ज देण्यास आमची बँक कटिबद्ध आहे. रोजगार निर्मितीच्यादृष्टीने महिला बचत गटांना केडीसीसी मोबाईल बँकिंग ॲप व मायक्रो एटीएम सेंटर या सुविधा पुरवणार असल्याचे, ते म्हणाले. यावेळी कबनूर येथील जिजामाता महिला बचत गट व संस्कृती महिला बचत गट, तसेच कोल्हापुरातील प्रिन्सेस पद्माराजे महिला बचत गट, पद्माराजे उद्यान महिला बचत गट,  महालक्ष्मी महिला बचत गट, निगवे दुमाला येथील राजलक्ष्मी महिला बचत गट, पारगाव येथील संघर्ष महिला बचत गट या बचत गटांना दप्तर वाटप झाले.शेती कर्जे विभागाचे उपव्यवस्थापक अजित जाधव यांनी स्वागत केले.  प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या उपव्यवस्थापक सौ. रंजना स्वामी यांनी केले.
सूत्रसंचालन सौ. गिरीजा पुजारी यांनी केले. आभार प्रशासन विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments