“क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले” यांचा आदर्श घेत त्यांच्याच विचारावर वाटचाल करणाऱ्या सौ. गंधाली सुहास दिंडे
कोल्हापूर/ (श्रद्धा जोगळेकर)
स्त्री सक्षमीकरणाचा वसा घेतलेल्या सौ.गंधाली सुहास दिंडे यांचे शिक्षण एम कॉम पर्यंत इचलकरंजी येथे झाले. माहेरी सुखवस्तू घरी जन्मलेल्या गंधाली दिंडे यांचा लग्नानंतर मात्र संघर्षमय प्रवास चालू झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्षमय, अतिशय खडतर प्रवास त्यांच्या वाट्याला आला. मात्र पतीच्या साथीने त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले व आयुष्याला एक नवी कलाटणी, नवीन ऊर्जा देत असंख्य स्त्रीशक्तीचा त्या प्रेरणास्थान बनल्या. महिला सक्षमीकरणाचे व्रत घेतलेल्या गंधाली दिंडे यांनी अनेक महिलांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण केले. गंधाली दिंडे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आज पर्यंत संपूर्ण राज्यभर प्रशिक्षण घेतली महिला प्रशिक्षणामध्ये असंख्य महिलांना लघु उद्योग, मध्यम उद्योग असे वेगवेगळ्या उद्योगांचे प्रशिक्षण देऊन त्यांचे व्यवसाय उभे केले. शासकीय वेगवेगळ्या योजना महिलांना मिळवून दिल्या. महिलांचे छोट्याशा व्यवसायातून आर्थिक उन्नती साधली त्याच प्रमाणे छोट्याच्या व्यवसायाचे वटवृक्ष करून असंख्य महिला उद्योजिका घडवल्या. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज सहाय्य शासकीय योजनांच्या माध्यमातून सहाय्य व वेगवेगळे महिलांच्या औद्योगिक व्यावसायिक प्रश्न शास्त्रशुद्ध प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी महिलांना शिकवल्या प्रत्येक महिला ही आत्मनिर्भर झाली पाहिजे, आर्थिक स्थैर्य तिला लाभले पाहिजे यादृष्टिने ध्यास घेऊन महिला सक्षमीकरणाचा अहोरात्र प्रयत्न करत आहात वेगवेगळ्या संस्था औद्योगिक संस्था सामाजिक संस्था व वेगवेगळ्या प्रकारचे सक्षमीकरण कार्यक्रम राबून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारावर वाटचाल करणाऱ्या सौ गंधाली सुहास दिंडे आज अनेक महिलांच्या आदर्श व प्रेरणास्थान बनले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज महाराष्ट्र शासन पुरस्कृत उद्योजकता विकास केंद्र मुंबई येथे तज्ञ सल्लागार पदी यांची निवड झाली आहे त्याचबरोबर महिलांच्या आरोग्य, महिलांच्या आर्थिक स्थैर्य व महिलांचे विविध प्रश्न यासाठी नेहमी त्या सजग असतात.