Sunday, December 1, 2024
Home ताज्या पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयात बैठक घेऊ - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ...

पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयात बैठक घेऊ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयात बैठक घेऊ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कागल/प्रतिनिधी : लष्करातून सेवानिवृत्त होऊन सरकारच्या सेवेत कार्यरत पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामविकास मंत्रालयात बैठक घेऊ, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही बैठक घेऊन, या संघटनेचे प्रश्न मार्गी लावू असे श्री. मुश्रीफ म्हणाले.शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना -महाराष्ट्र राज्यच्या पदाधिकाऱ्यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलच्या शासकीय विश्रामगृहात भेट घेतली व समस्यांचे निवेदन दिले.यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, भारतमातेच्या संरक्षणार्थ प्राणांची बाजी लावून सैनिक आपल्या कुटुंब आणि घरा-दारापासून दुरवर सेवा बजावत असतात. सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते महाराष्ट्र सरकारच्या सेवेत पुन्हा दाखल होत असतात. अशा पुनर्नियुक्त माजी सैनिकांना त्यांच्या स्थानिक जिल्ह्यातच नियुक्ती मिळून त्यांना अधिकाधिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहू. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाजीराव देशमुख म्हणाले, सैनिकानी  भारतमातेच्या संरक्षणासाठी ऐन उमेदीची, तारुण्याची वीस वर्ष कुटुंबापासून दुर राहून खर्ची घातलेली असतात. पुनर्नियुक्त सेवेत असतानाही त्यांच्या वाट्याला हीच वेळ येते.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष  बाजीराव देशमुख , राज्याचे समन्वयक दिलावर शानेदीवान , मंत्रालय कक्ष अधिकारी श्री. भुजबळ , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर श्री. पवार , सांगली जिल्हा अध्यक्ष श्री. जगताप , उपाध्यक्ष सासणे, सचिव शिवाजी चव्हाण , सिंधुदुर्ग जिल्हा  अध्यक्ष श्री. बचाटे , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील, सचिव विलास चव्हाण, सल्लागार श्री. सावर्डेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट…….
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आजी- माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या मालमत्ता करात सूट केल्याबद्दल संघटनेच्या अधिकार पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. तसेच भारतमातेच्या संरक्षणासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांसाठी तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला जाहीर केलेल्या पाच लाख रुपये मदतीचाही उल्लेख यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments