Tuesday, July 23, 2024
Home ताज्या रविवारचे जोतिबा खेटे नियोजन नको - जिल्हाधिकारी यांचे देवस्थान समितीस सुचना पत्र

रविवारचे जोतिबा खेटे नियोजन नको – जिल्हाधिकारी यांचे देवस्थान समितीस सुचना पत्र

रविवारचे जोतिबा खेटे नियोजन नको – जिल्हाधिकारी यांचे देवस्थान समितीस सुचना पत्र

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे २८ फेब्रुवारीपासून पुढील चार रविवारी होणारे जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत . ‘ असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अवर सचिव तथा सचिवांना आज पाठविले आहे . मात्र पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी -पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे . दरवर्षी श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे होणाऱ्या श्री जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची -नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर व परिसरात होत असते . यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी पासून पुढील चार रविवारी श्री जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची -नागरिकांची क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने श्री जोतिबा खेटे आयोजित करु नयेत असे कळवले आहे . श्री जोतिबा खेटे कार्यक्रमास भाविकांना व नागरिकांना प्रवेश देण्यात येवू नये , असे यात म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पाश्वैभुमीवर ही भुमिका जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments