Tuesday, December 10, 2024
Home ताज्या बहुजन पत्रकार संघाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विचारशील कृतीतून साजरी ब्लड...

बहुजन पत्रकार संघाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विचारशील कृतीतून साजरी ब्लड कॅन्सर ग्रस्त मुलीला दहा हजाराचा धनादेश प्रदान

बहुजन पत्रकार संघाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विचारशील कृतीतून साजरी ब्लड कॅन्सर ग्रस्त मुलीला दहा हजाराचा धनादेश प्रदान

कोल्हापूर /प्रतिनिधी : रोजी अखंड हिंदुस्थानचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती निमीत्त शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन कोल्हापूर बहुजन पत्रकार संघ व ग्रोबझ यांच्या संयुक्त विद्यमाने छ.शिवाजी महाराज यांची जयंती विचारशील कृतीतून साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती
समाजकल्यान चे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे  शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मा.श्रीकृष्ण कटकधोंड
ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड.धनंजय पठाडे
मा.विश्वास कोळी (सी.एम.डी.ग्रोबझ)
जेष्ठ अॅड परवेजभाई खान, डी.जी भास्कर सर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी कोल्हटकर उपाध्यक्ष मुबारक आत्तार, रवीसागर हाळवणकर, प्रकाश कांबळे,आफताब खान, स्वप्निल पन्हाळकर, बाजीराव गावकर व संघाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच सामाजीक बांधिलकी म्हणुन कु. सिद्धी मोहन कांबळे, रा. आडुळ, ता.करवीर या छोटया मुलीस ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले असून तिच्या उपचाराचा खर्च भागवण्याचा प्रश्न निर्माण झाला असुन ग्रोबझ आणि कोल्हापूर बहुजन पत्रकार संघ व मानवधिकारी न्याय सुरक्षा ट्रस्ट कोल्हापूर अध्यक्ष महम्मदयासीन शेख यांच्या संयुक्त सहकार्यातुन मदतनिधीचा १०,००० धनादेश सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुपुर्त करण्यात आला. सिद्धी मोहन कांबळे या मुलीस पुढील उपचारास पत्रकार संघ व मानव अधिकार ट्रस्ट कार्यशील राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं...

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९...

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन   कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट...

Recent Comments