रिझर्व्ह बँकेत माजी सैनिकांसाठी
सुरक्षा रक्षकाची पदभरती
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये माजी सैनिक प्रवर्गातून सुरक्षा रक्षकाची (कायमस्वरूपी) पदे भरावयाची असून दि. १२ फेब्रुवारीपूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल आर.आर. जाधव यांनी केले आहे.जिल्ह्यातील सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी बँकेच्या (https://opportunities.rbi.org.in/Scripts/bsviewcontent.aspx?Id=3942#FULL) लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचे असल्याचे श्री. जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.