Tuesday, December 10, 2024
Home ताज्या दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका १५ फेब्रुवारीपासून

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका १५ फेब्रुवारीपासून

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका १५ फेब्रुवारीपासून

कोल्हापूर/प्रतिनिधी :  खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FS दि. १२ फेब्रुवारीपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FT  दि. १५ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.४५ ते २ या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.४५ ते २ या वेळेत आणून द्यावा. धनाकर्ष शक्यतो STATE BANK OF INDIA (SBI) या बँकेचाच असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल क्रमांक व मागणी केलेली मालिका पसंती क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून दि. १६ फेब्रुवारी रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाप्यात सकाळी ९.४५ ते २ या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एक पेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाचा लिलाव दि. १६ फेब्रुवारीरोजी दुपारी ४ वा. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी  यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे  प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं...

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९...

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन   कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट...

Recent Comments