Sunday, December 22, 2024
Home ताज्या उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी १८ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी १८ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी
१८ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : नेहरू युवा केंद्र, संगठणमार्फत प्रत्येक वर्षी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी मंडळांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक युवा मंडळे व महिला मंडळांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह दि. १८ फेब्रुवारीपर्यंत नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी श्रीमती पूजा यांनी केले आहे.जिल्ह्यातील युवा मंडळे व महिला मंडळांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवा मंडळास जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अशा तीन पातळीवर पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा पातळीवर निवड केलेल्या युवा मंडळास  पंचवीस हजार रूपये, राज्य पातळीवर एक लाख रूपये, राष्ट्रीय पातळीवर प्रथम पाच लाख रूपये,तीन लाख रूपये, तृतीय दोन लाखरूपये अशा तीन क्रमांकावर रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र या स्वरुपात पुरस्कार दिला जातो. पुरस्कार निवडीसाठी मंडळाने रक्तदान, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, साक्षरता, एड्स निर्मुलन, पाणलोट क्षेत्र विकास, राष्ट्रीय एकात्मता, मोलमजुरी निर्मुलन, आपत्कालीन सहाय्य, ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम रोजगार निर्माण, प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा बँक योजना, कुटुंब कल्याण, बचतगट,क्रिडा कौशल्य, व्यवसाय प्रशिक्षण, पल्स पोलिओ, साक्षरता कार्यक्रम, महिला सशक्तीकरण, रोजगार निर्मिती, स्वच्छता मोहीम, वाईट चालीरीती विरोधी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय दिन व इतर समाजकल्याणचे कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. मुलगी वाचवा अभियान, स्वच्छ भारत समर इंटरशिप कार्यक्रम, कुटुंब कल्याण नियोजन, बचतगट यासाठी केलेले कार्य विशेष विचारात घेतले जाईल. पुरस्कारासाठी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील कार्य व कार्यक्रमाचेमूल्यांकन करून पुरस्कार निवडले जातात. तसेच पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवा मंडळ ३ वर्षापूर्वीचे नोंदणी कृत आणि नेहरू युवा केंद्राशी संलग्न असावे.
सविस्तर अहवाल कार्यक्रमाचे पूर्ण माहितीसह फोटो, वर्तमानपत्र कात्रण, कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका इत्यादी माहितीसह आणि विहित नमुन्यातील अर्ज सविस्तर माहितीसह नेहरू युवा केंद्राकडे करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक ०२३१-२५४८९९९ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments