Sunday, December 22, 2024
Home ताज्या भाजपा जिल्हा कार्यालयात स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

भाजपा जिल्हा कार्यालयात स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

भाजपा जिल्हा कार्यालयात
स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : एकात्ममानवतावाद व अंत्योदय या विचारांचे प्रणेते, प्रखर राष्ट्रभक्त स्व.पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृती दिनानिमित्य भाजपा जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांच्या हस्ते पंडीतजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच समर्पण पेटीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी आपले समर्पण जमा केले.
भाजपा जिल्हा कार्यालयात प.म.देव्स्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, माजी आमदार अमल महाडीक यांनी मा.प्रविण दरेकार यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाले,एकात्ममानवतावाद आणि अंत्योदय यांचे तत्वज्ञान हे पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक आहे. पं.दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले सारे जीवन संघटनेसाठी व राष्ट्रासाठी समर्पित केले. सिव्हिल सर्विस ची परीक्षा पास होऊन देखील त्यांनी संघटनेसाठी त्या पदाचा त्याग केला.
प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, भाजपा हा पार्टी विथ डिफरन्स असा पक्ष आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या थोर व्यक्तींमुळेच भाजपा हा पक्ष घडला आहे. आजच्या कार्यकर्त्यांनी पंडितजींच्या समर्पित जीवनाचा आदर्श घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त समर्पण भारतीय जनता पार्टीसाठी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारत देश आणि भारतीयांच्या उन्नतीसाठी मार्ग दाखविला. पंडीतजींच्या या अंत्योदयातील कल्पनेने प्रेरित होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातील एनडीए सरकार आणि सर्व राज्यांतील सरकारे असलेल्या भाजपा सरकार अंत्योदयच्या मार्गाकडे वाटचाल करत असल्याचे नमुद केले. दीनदयाळ जी आणि त्यांची आर्थिक धोरणे नेहमीच गरिबांच्या हितावर भर देण्याविषयी सांगतात. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, विजय अग्रवाल, किशोरी स्वामी, सचिन तोडकर, संजय सावंत, राजू मोरे,चिटणीस प्रमोदिनी हार्डिकर, दिग्विजय कालेकर, संदीप कुंभार, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, भरत काळे, डॉ. सदानंद राजवर्धन, अजित ठाणेकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, विवेक वोरा, दिलीप बोंद्रे, विशाल शिराळकर, सुधीर देसाई, जाधव, अमित शिंदे, रोहित कारंडे, विद्या बनछोडे, तानाजी निकम, दिनेश पसारे, शैलेश जाधव,किशोरी स्वामी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments