कागल तालुक्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश नविद मुश्रीफ यांनी मानले आभार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहिर झाले असून ५३ पैकी ५० सरपंच महाविकास आघाडीचे होणार, जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी केले. ही अतिशय आनंदाची बाब आहे. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. आपापल्या गावाच्या विकासासाठी सर्वजण निश्चितच सक्रीय असतील हा विश्वास आहे.
आपण सर्वजणांनी मतदान करुन लोकशाहीचे संवर्धन करण्यात हातभार लावला याबद्दल मतदारांचे मनापासून आभार. याशिवाय संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सक्रीय काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचेही नविद मुश्रीफ यांनी मानले मनापासून आभार.