इचलकरंजी पालिकेच्या पहिल्या नगरसेविका कलावतीबाई मुठाणे यांचे निधन
इचलकरंजी/प्रतिनिधी : इचलकरंजी पालिकेच्या पहिल्या नगरसेविका श्रीमती कलावतीबाई आण्णासाहेब मुठाणे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. इचलकरंजी नगरपालिकेच्या १९५२-५७ सालाच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगरसेविका म्हणून श्रीमती मुठाणे यांची ओळख आहे. कर्तव्यकठोर आॅक्ट्राॅय चेअरमन, राष्ट्र सेवा दलाच्या ऊंड्री(पुणे) येथील भाई वैद्य, पन्नालालजी सुराणा शिबिरार्थी असलेल्या पहिल्या शिबिराच्या प्रबोधक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्या, इचल.न.पा.च्या पहिल्या टि.पी.स्कीमच्या व पाणी पुरवठा स्कीमच्या संकल्पक त्या होत्या. त्यांनी१९७७मध्ये महिला पंतप्रधान इंदिराजी अटकेनिषेधार्थ आंदोलनात नेतृत्व करताना तुरूंगवास भोगला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्या सहभागी होत्या. त्यांच्या जाण्याने इचलकरंजीतील स्वातंत्र्य चळवळीचा दुवा निखळला आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,सुना,जावा,नातवंडे असा मोठा परिवार आहे.