Tuesday, July 23, 2024
Home ताज्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक पतसंस्था महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट आणि आदर्श पतसंस्था आहे -आमदार...

कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक पतसंस्था महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट आणि आदर्श पतसंस्था आहे -आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक पतसंस्था महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट आणि आदर्श पतसंस्था आहे -आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कामकाजाचा अहवाल पाहतात तसेच पतसंस्थेने सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध योजना पाहता ही एक महाराष्ट्रातील गुणवंत व आदर्श पतसंस्था असल्याचे उद्गार माननीय आमदार चंद्रकांत जाधव यांनी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा ‘विद्याभवन’ येथे झालेल्या गुणगौरव आणि सत्कार समारंभ प्रसंगी काढले .यावेळी अध्यक्षस्थानी सभापती संजय पाटील होते माननीय आमदार पुढे म्हणाले संस्थेने ठेवीदारांना योग्य दर देऊन कर्जाचा दरही अत्यंत कमी ठेवलेला आहे .त्याचबरोबर नवीन पेन्शन धारकांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केलेली योजना अत्यंत महत्त्वाची आहे . हे उत्तम काम संस्थेने केले आहे . अनेक सभासदांनी केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या पाल्यांनी विविध परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले .तसेच महानगरपालिका शिक्षकांच्या वेतनावरील खर्च 100% शासन अनुदानातून मिळावा यासाठी पाठपुरावा करू व शिक्षकांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे अभिवचन यानिमित्ताने दिले .यावेळी पुणे शिक्षक विभागाचे नूतन आमदार माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला त्यांनीही शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले . तसेच सर्वांनी मिळून शिक्षण क्षेत्रामध्ये निकोप वातावरण ठेवण्यासाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कायमपणे पाठीशी राहणार असल्याचे सांगितले . यावेळी जवळपास तीस वर्षाहून अधिक काळ पतसंस्थेचे संचालकतसेच सभापती म्हणून काम केलेले ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशनचे (आयफेटो) राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा व इतिहासाचा आढावा घेतला ,पतसंस्थे मध्ये राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली पतसंस्थेच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची जाणीव सभासदांना करून दिली . शिक्षक समितीचे नेते दिलीपराव भोईटे खजानीस उमेश देसाई यांचीही मनोगते झाली . यावेळी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व विविध संस्थांकडून आदर्श पुरस्कार मिळालेल्या सभासदांचा, शिष्यवृत्ती परीक्षेत मार्गदर्शक केलेल्या शिक्षकांचा ,पीएचडी पदवी प्राप्त करणारे अजित पाटील ,मनपाच्या शाळांना मदत करणारे द्वारकानाथ भोसले, त्याचबरोबर सभासदांच्या पाल्यांनी विविध परीक्षेमध्ये यश संपादन केले ,अशा सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधाकर सावंत, सूत्रसंचालन सुवर्णा सोनाळकर – संदीप जाधव व आभार प्रदर्शन संजय कडगावे यांनी केले . यावेळी उपसभापती मनोहर शिंदे, वसंत आडके, प्रकाश पाटील ,आशालता कांजर, सरिता सुतार, सुभाष धादवड ,राजेंद्र गेंजगे,शकील भेंडवडे, विजय जाधव ,दिलीप माने, मनोज सोरप आदी संचालक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments