कोल्हापूरच्या प्रणव भोपळेचे फुटबॉल विश्वात एका वर्षात दोन वेळा विक्रम – गिनिज बुकात नोंद
कोल्हापूर/प्रतिनिधी : कपाळ ते नाका दरम्यान सलग एक मिनिट १० सेंकद फुटबॉल ठेवून तो ८२ वेळा फरविण्याचा विक्रम कोल्हापूरचा युवा आणि प्रतिभाशाली खेळडू प्रणव भोपळे ने नोंदवला आहे. लाँकडाऊनच्या काळात सावली ब्रिज येथे प्रशिक्षण घेऊन एकाच वर्षी दोन विश्वविक्रम करण्याचा पराक्रम केला आहे. आँगस्ट महिन्यात ऊजव्या पायाच्या गुडघ्यावर चार तास २२ मिनिटे फुटबॉल स्थिर ठेवण्याचा विक्रम नोंदवला होता तर या महिन्यात आपल्या कपाळ ते नाकादरम्यान एक मिनिटे दहा सेकंद फुटबॉल स्पीड ८२ वेळा फिरवण्याचा विक्रम त्यांने केला आहे. सध्या तो डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविघालयात शिकत आहे. त्याच्या या दोन विक्रमाने जागतिक पातळीवर आता युवकांना नव नविन विक्रम करण्याचे दालनच खुले झाले आहे. या विक्रमा बद्दल खाटीक समाजासह ब्रिजचे किशोर देशपांडे ब्रिजेश पटेल यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे.