कोल्हापूरचे प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंडरगी यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप प्रफुल्चंद मुंडरगी यांचे गुरुवारी, (ता. सात) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ६० वर्षाचे होते. मित्रपरिवारामध्ये नाना या नावांनी ते परिचित होते. अॅड. मुंडरगी हे गेले काही दिवस आजारी होते. किडनी विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
कोल्हापुरातील जुन्या काळातील नामवंत वकील प्रफुल्लचंद मुंडरगी यांचे ते सुपुत्र. अॅड दिलीप मुंडरगी यांनी ही वकिली व्यवसायात नावलौकिक मिळवला होता. अनेक गाजलेल्या खटल्यात त्यांनी वकिली केली होती. दरम्यान रुईकर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थान येथून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे.