ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्काराने संताजी घोरपडे साखर कारखाना सन्मानित
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अधिकरण, पुणे (महाऊर्जा) अंतर्गत १४ व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्कार वितरण सोहळ्यात सन २०१८- २०१९ या वर्षीचा ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनाचा कार्य अहवाल इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए पाटील यांनी सादर केला होता. सदर अहवालाची दखल घेऊन कारखान्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा हा सोहळा यावेळी कोरोना महामारीचा विचार करता हा पुरस्कार कारखान्याच्या कार्यस्थळावर पाठवण्यात आलेला आहे. या पुरस्कारासाठी विशेष मार्गदर्शन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे लाभले आहे.
या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, चीफ इंजिनियर हुसेन नदाफ, इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए.पाटील, को- जन मॅनेजर मिलिंद पंडे, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, अकाउंट विभागाचे विवेक पाटील आदी उपस्थित होते.