रंकाळा स्टॅण्ड परिसरातील बालाजीऍ़क्वा व शुध्द पेयजल व्यवसाय सिल
कोल्हापूर/प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासन यांचेमार्फत प्राप्त प्रमाणपत्र, ना हरकत पत्र नसलेने रंकाळा स्टॅण्ड परिसरातील बालाजी ऍ़क्वा व शुध्द पेयजल व्यवसाय परवाना विभागाच्यावतीने सिल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली न्यायालयामार्फत दावा क्र.७५/२०१७ व्दारे विविध राज्यातील/जिल्ह्यातील/शहरातील थंड पाण्याचे कॅन व्दारे पाणी पुन्हा भरणे, साठा करणे, हाताळणी करणे, विक्री करणे इत्यादी प्रक्रिया करणा-या संस्थाकडे परवाना असणे आवश्यक आहे. यासाठी परवाना /म.प्र.नि. मंडळ संमतीपत्र/अन्न व औषध प्रशासन यांचे प्रमाणपत्र, ना हरकत पत्र नसलेस सदरील प्रकल्प त्वरीत बंद करणेबाबत निर्देशित केले आहे.
त्यामुळे महानगरपालिका हद्दीतील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या संस्थावर कारवाई करणेबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आदेशानुसार शहरातील ७ संस्थाना नोटीस देण्यात आल्या होत्या. यापैकी २ संस्थानी मुदतीत व्यवसाय बंद न केलेमुळे रंकाळा स्टॅण्ड परिसरातील बालाजी ऍ़क्वा व शुध्द पेयजल यांचे व्यवसाय सिलबंद करण्यात आले.
सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व परवाना अधिक्षक रामचंद्र काटकर यांचे मागदर्शनाखाली संजय अतिग्रे, मंदार कुलकर्णी, रविंद्र पोवार, विजय वाघेला, निलेश कदम व लियाकत बारस्कर, शकील पठाण, राजाराम निगवेकर यांनी केली.