कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे वाजले बिगुल
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक वाजल्यापासून नगरसेवक पदाची निवडणूक लवकरच होत आहे त्यासाठी ची आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 21 डिसेंबरला आरक्षण सोडत होणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची सत्ता आहे तर विरोधी गटात ताराराणी आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांचे नगरसेवक आहेत त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्र आलेले महा विकास आघाडी आणि विरोधी गटातील आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याशी होणार आहे निवडणुकीची तयारी सुरू झाली असून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.२१ डिसेंबर रोजी होणार आरक्षण सोडत होणार आहे तर ८१ प्रभागात रंगणार अटीतटीची निवडणुकीची लढत होणार आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी होणार लढत होणार असून केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी ११ वाजता ही आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.तर २३ डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत यावर हरकती व सूचना मागवून त्यानंतर अंतिम आरक्षण घोषणा होणार आहे.