कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीकडून महानगरपालिके समोर या नवीन आदेशाची होळी
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्यावतीने जन्म-मृत्यू दाखल्यासाठी चालू घरफाळा भरलेले ची पावती देणे बंधनकारक केले आहे ही बाब व्यावहारिकदृष्ट्या उचित नाही जन्म आणि मृत्यू ही मानवाच्या जीवनातील अतिशय संवेदनशील बाब आहे त्यासाठी दाखले आवश्यक आहेत
महापालिकेची थकबाकी वसुली झाली पाहीजे पण वसुलीसाठी हा मार्ग योग्य नाही असे म्हणत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती कोल्हापूरने असा आदेश काढलाच कसा असे म्हणत या नव्या आदेशाची होळी करत तीव्र निदर्शने केली.
याच महापालिकेत घरफाळा घोटाळा झालेला असून आम्ही घोटाळा करणारे आणि त्याला पाठीशी घालणारे मिळकत धारक दरोडेखोर यांच्यावर कारवाई करून रक्कम वसूल करा अशी गेली सहा महिने मागणी करतोय पण त्यामध्ये चालढकल चाललेली आहे थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचे कोणी हात बांधलेले नाहीत पण वसुली चा हा मार्ग म्हणजे हानीला बोळा आणि दरवाजा उघडा असा प्रकार आहे
उद्या थकबाकीदारां साठी मशानात मोफत अंत्यविधीला नकार मिळेल की काय अशीही शंका येते
आम्ही महापालिकेच्या निवेदनाद्वारे विनंती करतो की हा आदेश त्वरित रद्द करावा घरफाळा घोटाळ्यातील दोषी कडून घोटाळा झालेली रक्कम वसूल करावा आणि नाईलाजाने नागरी हक्क म्हणून आपण काढलेल्या आदेशाची होळी करीत आहोत आणि प्रशासक राजवट म्हणजे हुकूमशाही नवे याचे भान ठेवावे कोल्हापूरची जनता चांगल्या कामास सदैव पाठबळ देते याची नोंद घ्यावी असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने दिला आहे.
यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ गोडगे, यशवंत वाळवेकर, अजित सासणे, परवेज सय्यद, रणजीत पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू मालेकर, विनोद डूणूंग, एस एन माळकर, उत्तम वंदूर, शामराव शिंदे,कादर मलबारी आदी सहभागी झाले होते.