राज्यात सरासरी वीजदेयक आकारण्याची पद्धत तात्काळ बंद करावी ! – नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा
मुंबई/प्रतिनिधी: घरामध्ये मीटर नसतांना गरीबांना वीजदेयक जाणे चुकीचे आहे. हे राजकीय सूत्र नाही. राज्यात सरासरी वीजदेयक आकारण्याची पद्धत तात्काळ बंद करावी, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी वीजमंत्री नितीन राऊत यांना दिले. १५ डिसेंबर या दिवशी सभागृहात पुरवणी मागण्यांवर बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीजमीटर नसतांना राज्यांतील अनेक नागरिकांना वीजदेयक आकारण्यात आले आहे, तसेच वीजदेयकाची रक्कम वाढवून देण्यात आली आहे, ही सूत्रे उपस्थित केली. यावर नाना पटोले यांनी वरील सूचना केली.