Monday, December 23, 2024
Home ताज्या स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या जिंजी किल्ल्यास छत्रपती संभाजीराजे यांनी दिली भेट

स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या जिंजी किल्ल्यास छत्रपती संभाजीराजे यांनी दिली भेट

स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या जिंजी किल्ल्यास छत्रपती संभाजीराजे यांनी दिली भेट

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला. पूर्वी असलेला किल्ला पाडून नव्याने महाराजांंनी हा किल्ला बांधून घेतला. मराठ्यांच्या इतिहासात दुर्गराज रायगडला जितकं महत्व आहे तितकंच महत्व जिंजीच्या किल्ल्याला सुध्दा आहे.स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या जिंजी किल्ल्यास छत्रपती संभाजीराजे यांनी दिली भेट.
शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांना फंदफितूरीने पकडून छळ करुन मारण्यात आले. त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून राज्यकारभार पाहू लागले. यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले. परिणामी स्वराज्यावरील मुघल सैन्याचा दबाव कमी झाला व मराठ्यांनी गेलेले किल्ले व प्रदेश पुन्हा जिंकून घेतले.
जिंजीसारखा अभेद्य किल्ला पाहताना महाराजांच्या दूरदृष्टीची जाणीव पदोपदी होत होती. पूर्वी या ठिकाणी कृष्णगिरी, राजगिरी, चंद्रयान दुर्ग (चंद्रगिरी) हे वेगवेगळे तीन किल्ले होते ; तिथे संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदी बांधून तिघांचा मिळून एक किल्ला शिवाजी महाराजांनी केला. पाण्याच्या टाक्यांचा संरक्षणदृष्टया वापर अतिशय खुबीने केलेला आहे. महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करुन वस्तूसंग्रालय उभारण्यासाठी व राजसदरचे संवर्धन करण्यासाठी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५०लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे.
या संदर्भात अधिक माहीती देताना, छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा,संपुर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्याच जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने जाणिव पुर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिंजी किल्ल्याला भेट दिल्यानंतर मा. मुख्यमंत्री यांच्याशी याविषयी फोनवर सविस्तरपणे चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिंजी किल्ल्यावरील राजसदरेच्या संवर्धनासाठी व वस्तूसंग्रालय उभारणीसाठी तत्काळ ५०लाख रुपयाचा निधी देण्याचे मान्य केले आहे.यासाठी मुख्यमंत्र्यांचे छत्रपती संभाजीराजे यांनी यासाठी विशेष अभार व्यक्त केले आहे.
वास्तूशास्त्र व युध्दशास्त्राच्या दृष्टीने जिंजी हा उत्कृष्ट असा किल्ला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments