एनसीसी कॅडेट्ससाठी आयोजित ऑनलाईन कोर्स ‘मदत’ मध्ये राज्यातील १००० एनसीसी कॅडेट्सचा सहभाग
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय):एनसीसी कॅडेट्ससाठी विनामूल्य आयोजित केलेल्या ऑनलाईन कोर्स ‘मदत’ मध्ये राज्यातील सुमारे १००० एनसीसी कॅडेट सामील झाल्याची माहिती कोल्हापूर मुख्यालय येथील एनसीसी कर्नल आणि मुख्य प्रशासन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट, हैदराबाद यांच्याशी सल्लामसलत करून कोल्हापूर एनसीसी ग्रुप मुख्यालय महाराष्ट्र एनसीसी संचालनालय मुंबईच्या वतीने या कोर्सचे संयोजन केले आहे. या ऑनलाईन मुख्य उद्दीष्टे म्हणजे प्रायोगिक योग, विश्रांती चिंतन तंत्र, विचारांची शक्ती, संप्रेषण कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये, निर्णय घेण्याची कौशल्ये आणि वेळ व्यवस्थापन अशी होती. या कोर्सचा पहिला विभाग ४ डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात येणार आहे. अभ्यासक्रम तणावमुक्ती, वर्णनिर्मिती आणि सकारात्मक विचारसरणीसाठी खूप उपयुक्त होता असे मत या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सनी व्यक्त केले आहे. या कोर्सचा समारोप ४ डिसेंबर रोजी होणार असल्याचेही कोल्हापूर मुख्यालय येथील एनसीसी कर्नल आणि मुख्य प्रशासन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.