Sunday, December 8, 2024
Home ताज्या अरुण लाड व जयंत आसगावकर पदवीधर व शिक्षकांच्या समस्या सोडवतील - ग्रामविकास...

अरुण लाड व जयंत आसगावकर पदवीधर व शिक्षकांच्या समस्या सोडवतील – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची चंदगडमध्ये मेळाव्यात ग्वाही  

अरुण लाड व जयंत आसगावकर पदवीधर व शिक्षकांच्या समस्या सोडवतील – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची चंदगडमध्ये मेळाव्यात ग्वाही
चंदगड/प्रतिनिधी :अरुण लाड व जयंत आसगावकर हे दोघेही आमदार म्हणून पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडवतील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हे दोन्हीही उमेदवार सामाजिक चळवळी आणि शैक्षणिक चळवळीशी संबंधित असल्याचेही श्री मुश्रीफ म्हणाले.
चंदगडमध्ये विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर यांच्या  प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या दहा-बारा वर्षात पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न प्रलंबितच राहिले. पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी श्री. लाड व श्री. आसगावकर याना पाठबळ द्या.
ॲड. प्रकाश लाड म्हणाले, चांगल्या समाजनिर्मितीसाठी पदवीधर आणि शिक्षकांचे चांगले आमदार प्रतिनिध असणे गरजेचे आहे.
आमदार राजेश पाटील म्हणाले, अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या विजयासाठी चंदगड, गडहिग्लज विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष हातात हात घालून संघटितपणे काम करू.यावेळी खेडूत खेडूत शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. आर. पी. पाटील, ॲड. प्रकाश लाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव देवने, संग्रामसिंह कुपेकर, विद्याधर गुरबे यांचीही भाषणे झाली.
व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. प्राची कानेकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर गुरबे,  सौ. संज्योती मळवीकर,  प्रा. आर. पी. पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई, शिवसेनेचे संघटक संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, चंदगड अर्बन बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, चंदगड राष्ट्रवादीचे अध्यक्ष भिकू गावडे, बाळासाहेब पिळणकर, अशोक देसाई, संग्रामसिंह अडकूरकर, राजू रेडेकर, सौ. संगीता पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत शिवानंद हुंबरवाडी यांनी केले. सूत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले.

चौकट………
त्यांना वेड लागायची पाळी आली………
मंत्री मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा विश्वासघात करायचा चंगच बांधला होता. आपलंच सरकार स्थापन होईल, अशा अविर्भावात असलेल्या भाजपचे १०५ आमदार येऊनही विरोधात बसावं लागल्यामुळे त्यांना वेड लागायची पाळी आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं...

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९...

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन   कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट...

Recent Comments