Thursday, December 12, 2024
Home ताज्या गार्डन्स क्लब हे निसर्गप्रेमींसाठी व्यासपीठ : उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद

गार्डन्स क्लब हे निसर्गप्रेमींसाठी व्यासपीठ : उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद

गार्डन्स क्लब हे निसर्गप्रेमींसाठी व्यासपीठ : उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद

गार्डन्स क्लब चे पुष्पप्रदर्शन नागरिकांसाठी खुले; निसर्गोत्सवाची पर्वणी फक्त

कोल्हापूर/प्रतिनिधी: फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच निसर्गप्रेमींसाठी निसर्ग जतन करणे आणि फुलांचे संगोपन, झाडांचे संवर्धन यासाठी ही संस्था कार्यरत आहे हे बघायला मिळाले. गार्डन्सा क्लबचे उपक्रम हे अतिशय स्तुत्य आहेत. निसर्ग आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे असे प्रतिपादन कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद यांनी केले. महावीर उद्यानात गार्डन्स क्लब व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ वे पुष्पप्रदर्शन आज नागरिकांसाठी खुले करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वनविभागाकडून शक्य तितकी मदत या निसर्गप्रेमींसाठी काम करणाऱ्या संस्थेस केली जाईल, अशी ग्वाही उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद यांनी यावेळी दिली.
मातीला जपलं नाही तर मोठ संकट येणार.. हा धोका ओळखून तसेच माती आपली आई आहे.आई निरोगी तर मुलं सुदृढ असतात. मातीचा पोत खराब होत आहे. या गंभीर आणि गहन प्रश्नावर जागृती आणि संदेश देण्यासाठी यंदाचे पुष्पप्रदर्शन भरवले गेले आहे. मातीशी आपुलकी वाढावी… प्लास्टिकचा वापर टाळा. या जाणिवा प्रगल्भित होण्यासाठी तसेच अभ्यासपूर्ण व्यक्त व्हावं यासाठी गार्डन्स क्लब हे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. जागतिक पातळीवर यावर संशोधन होते पण ते स्थानिक पातळीवर पोहोचण्यासाठी गार्डन्स क्लब दुवा म्हणून काम करत आहे.असा प्रदर्शनाचा उद्देश क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गार्डन्स क्लबचे नियतकालिक रोजेट आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात गार्डन्स क्लबतर्फे चालवल्या जाणाऱ्या ग्रीन एज्युकेशन अर्थात उद्यान विद्या व रोपवाटिका व्यवस्थापन या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात लक्षणीय संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आजी-माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्यामध्ये धनगरी नृत्य, भारूड, गाणी, लघुनाटीका यांचा समावेश होता.
तसेच स्कीट कॉम्पीटिशमध्ये ‘आपली माती आपले भवितव्य” या मध्यवर्ती संकल्पने अंतर्गत वेगवेगळे विषय निवडत स्पर्धकांनी आपली स्कीट्स सादर केली. या स्पर्धकांचे कौतुक व पारितोषिक वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. बिना जनवाडकर व कोल्हापुरातील नामवंत रंगकर्मी संजय हळदीकर विशेष पाहुणे म्हणून लाभले होते.
या स्पर्धेनंतर लगेचच कोल्हापुरातील सळसळत्या उत्साही तरुणाईचा आवडता बोटॅनिकल फॅशन शो, डीजे आणि लाईटिंगच्या साथीने दणक्यात पार पडला. दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील या बोटॅनिकल फॅशन शो मध्ये आगळ्या वेगळ्या कल्पनांसह पाने, फुले व फळे तसेच बिया, फळांच्या साली यांचा उपयोग करून तरुणाईने वेशभूषांचा आविष्कार सादर केला.गार्डन्स क्लबच्या सदस्या रचना …. व प्राजक्ता चरणे यांनी आभार प्रदर्शन केले.
क्लबच्या सदस्या अनिता ढवळे आणि रितू वाधवाणी यांनी सूत्रसंचालन केले.
गुलाबातील विविधता आणि विविध प्रकारची फुले, कुंडीतील रोपे, सॅलेड डेकोरेशन, बोन्साय, फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, मुक्त रचना, लॅन्डस्केपींग हे प्रदर्शनात आवर्जून पहावे असे आहे.
यावेळी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी,उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानिस प्राजक्ता चरणे ,सहसचिव शैला निकम, सह कोषाध्यक्ष सुनेत्रा ढवळे,कार्यकारणी सदस्य सुनिता पाटील, शशिकांत कदम, सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, सुभाषचंद्र अथणे, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी, रविंद्र साळोखे, संगीता कोकितकर, जयश्री कजरिया, दिपाली इंगवले,डॉ.स्मिता देशमुख, रोहिणी पाटील, मंदा कुलकर्णी, भक्ती डकरे, मयुरा पाटील, चिनार भिंगार्डे, वर्षा वायचळ, रेणुका वाधवाणी, दीपा भिंगार्डे, राजेश्वरी पवार, संगीता सावर्डेकर,पद्मा पाटील, निशिगंधा कुलकर्णी, सुनिता निल्ले, सिद्धी गनबोटे, हर्षदा शिरगावकर, कल्पना सावंत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments