गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महनगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वे पुष्प प्रदर्शन, ६, ७ व ८ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे होणार
कोल्हापूर/ प्रतिनिधी: पर्यावर्णाविषयी विशेष आस्था बाळगणाऱ्या गार्डन्स क्लबने या वर्षी “आपली माती, आपले भवितव्य” या संकल्पनेवर आधारीत रचना, सजावट तसेच प्रात्यक्षिके यांचा सुंदर मिलाफ कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळावा याची पूर्ण व्यवस्था केली आहे, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पूर्ण तीन दिवस चालणाऱ्या या हरीत महोत्सवात विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने तसेच बगिचांना लागणारे सर्व साहित्य पुरवणारे स्टॉल्स् यांची रेलचेल असेल. शहरवासियांना या प्रदर्शनात केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर पुणे, सांगली, बेळगांव, अश्या शहरांमधून बागेसाठी लागणारे नवनवीन साहित्य, जसे कुंड्या, स्टॅन्ड, रोपे, कंद, खते, हस्थारे वगैरे, बघण्याचा व खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे.
या प्रदर्शनाची सुरुवात शुक्रवार दि. ६ रोजी संध्या. ४ वा. शोभायात्रेने होईल, या मध्ये कोल्हापुरातील विविध शाळा, सामाजीक संस्था, क्लब व नागरिक मातीविषयक वेगवेगळ्या जनजागृती करणाऱ्या घोषणा देतील. आपल्या माती साठी प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देश या शोभायात्रेच्या पाठीमागे असेल. या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी व वेगवेगळ्या स्टॉल्सचे उद्घाटन करण्यासाठी या वर्षी क्लबने प्रमुख पाहुण्या म्हणून मा. वैष्णवी पाटील – डी. वाय. एस. पी. ॲन्टी करप्शन, प्रमोद माने – सबरिजनल ऑफिसर एमपीएससी बोर्ड व मा. हरीश सूळ – डेप्युटी कलेक्टर, एस. डी. एम. आजरा, कोल्हापूर यांना आमंत्रीत केले आहे.
या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून स्पॉट गार्डन कॉम्पीटिशनला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजल्यापासूम टेराकोटा जर्नी (गौरव काईंगडे) या संस्थेतर्फे मातीपासून विविध प्राणी बनवण्याचे प्रात्यक्षीक होईल, याची मजा लहान थोरांना मोफत लुटता येणार आहे. या कार्यशाळे दरम्यान प्रसिद्ध प्राणी व पक्षी अभ्यासक श्री. धनंजय जाधव यांचे ‘प्राणी शहराकडे का वळतात?’ या विषयावर माहितीपर व्याख्यान होईल, इच्छुकांनी मातीपासून प्राणी बनवण्यासाठी यात सामील व्हावे.शनिवार दि ७ डिसेंबर रोजी सकाळी पुष्प स्पर्धा होईल, ज्यात स्पर्थक आपल्याकडील फुललेले गुलाब, झेंडू, निशीगंध, जर्बेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील. या प्रसंगी पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन व उद्यान स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे गुरुप्रसाद डी. एफ. ओ., अध्यक्ष – कार्तिकेयन मुख्य कार्यकारी अधिकारी/ प्रशासक को. म.न.पा. तसेच विशेष अतिथी – मा. राजेंद्र दोशी, मा. शांतादेवी डी. पाटील या मान्यवरांच्या हस्ते होईल.
या औपचारीक उद्घाटन व पारितोषीक वितरणानंतर दुपारच्या सत्रात गार्डन्स क्लब तर्फे सुरु असणाऱ्या उद्यानविद्या व नर्सरी मॅनेजमेंट या कोर्सच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न होईल. त्या अंतर्गत, विविध गुणदर्शन तसेच विद्यार्थी मनोगत व स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. या मेळाव्यासाठी व भेटीगाठी साठी प्रेरणा शिवदास , सहायक निबंधक , सहकारी संस्था,प्रमुख पाहुण्या म्हणून तसेच कोर्स कोऑर्डीनेटर सौ प्रमिला बत्तासे व रश्मी भूमकर , सुषमा शेवडे , प्राध्यापक इत्यादी उपस्थित असतील.
संध्याकाळच्या सत्रात चार वाजल्यापासून ‘आपली माती आपले भवितव्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत स्कीट कॉम्पीटिशन घेण्यात येतील. व लगेचच कोल्हापूरातील तरुणाई ज्या उत्कंठावर्धक स्पर्धेची वाट पहात असतात अश्या सळसळत्या तरुणाईच्या, कल्पनांचा आविष्कार दाखवणारा ‘बोटॅनिकल फॅशन शो’ चा प्रारंभ होईल. कोल्हापुरातील तरुणी दर वर्षी नवनवीन कल्पना घेवून या रंगतदार फॅशन शो मध्ये सामील होत असतात. या स्पर्धामध्ये तरुणाईला प्रोत्साहन
देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. बीना जनवाडकर श्री. संजय हळदीकर तसेच नीरज व सौ. जीया झंवर व मा. कर्नल कुल्लोली आणि डॉ सौ कुल्लोली आवर्जुन उपस्थित रहाणार आहेत.
रविवारी ८ डिसेंबरच्या सकाळच्या गुलाबी थंडीत लहान थोरांच्या चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. या विशेष उत्साहपूर्ण स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर सिंग, सिनीयर असिस्टंट डायरेक्टर, हॅंडीक्रफ्ट सर्विस सेंटर, मिनीस्ट्री ऑफ टेक्सटाइल. , अध्यक्ष – मा. रमेश शहा, सुभाषचंद्र अथणे व विशेष अतिथी – विजयमाला मेस्त्री उपस्थित रहातील.चित्रकला स्पर्धेनंतर ‘हसत खेळत पर्यावरण ‘ अंतर्गत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिलराज जगदाळे हे मुलांचे पर्यावरणावर आधारित खेळ घेणार आहेत.
या नंतर दुपारी ११ ते १२.३० या वेळेत सौ. चिनार भिंगार्डे यांची ‘कॉयर क्राफ्ट’ या विषयावर, नारळाच्या तंतूपासून शोभेच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा संपन्न होईल. ही आगळी वेगळी कला शिकण्यासाठी कोल्हापूरकरांनी जरूर नावनोंदणी करावी.संध्याकाळी ‘शॉर्ट फिल्म” स्पर्धेतील निवडक व विजेते लघुपट पडद्यावर दाखवण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना बक्षीसे देण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून नाट्य व सिने कलावंत श्री. शरदजी भुताडीया तसेच
प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या
सौ. योगिनी कुलकर्णी, व सौ. लक्ष्मी शिरगांवकर यांना
पाचारण करण्यात आले आहे.
या औत्सुक्यपूर्ण कार्यक्रमानंतर सर्वांचा आवडता कार्यक्रम ज्याची स्पर्धक आतुरतेने वाट पहातात तो वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ होईल. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ व अध्यक्ष – मा. श्री राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त, को.म.न.पा. असतील. विशेष पाहुण्या म्हणून मा. मनीषा डुबुले, अतिरिक्त एस पी सी आय डी या लाभल्या आहेत. विशेष अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सौ. योगिनी कुलकर्णी, व सौ. लक्ष्मी शिरगांवकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. गार्डन्स क्लबच्या या विशेष सोहळ्यात या वर्षीच्या ‘आपली माती आपले भवितव्य’ संकल्पनेवर आधारीत अरुण मराठे याचे व्याख्यान ऐकण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. मराठे सर ॲग्रो केमिस्ट्री आणि साॅईल सायन्सचे 33 वर्षापासून अभ्यासक आणि अध्यापक आहेत. माती आणि शेती या विषयावर त्यांची असंख्य व्याख्याने प्रसिद्ध आहेत. या व्याख्यानानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानिस प्राजक्ता चरणे ,कार्यकारणी सदस्य सुनिता पाटील, शशिकांत कदम, सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी, कल्पना सावंत, संस्थापक सदस्य रवींद्र ओबेराय अरुण नरके उपस्थित होते.