घोडावत विद्यापीठातील लॉ विभागाचे २६ ऑगस्टला उद्घाटन,ॲड. उज्वल निकम प्रमुख अतिथी
अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठात स्कूल ऑफ लीगल स्टडीज (लॉ) विभागाचे उद्घाटन सोमवारी२६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील, पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी दिली.नुकतेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घोडावत विद्यापीठाच्या लाॅ अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. स्कूल ऑफ लीगल स्टडीज विभागांतर्गत एल.एल.बी तीन वर्षे,बी.ए एल.एल.बी ऑनर्स व बी.बी.ए एल.एल.बी ऑनर्स ५ वर्षे पदवी अभ्यासक्रमांची सुरुवात झाली आहे.१२ वी नंतर या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.याविषयी बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले,की लाॅ विभागासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा येेथे उभारण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिकांसाठी मुटकोर्ट (प्रतिरूप न्यायालय) गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम, ग्रंथालय,अभ्यासिका, पात्र शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
चौकट
चेअरमन संजय घोडावत
लॉचे पदवी शिक्षण देणारे पश्चिम महाराष्ट्रातील एक दर्जेदार विद्यापीठ म्हणून आम्ही नावारूपाला येऊ. यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना देऊ. भारतातील नामांकित ज्येष्ठ विधीज्ञ व निष्णात कायदे पंडित ॲड.उज्वल निकम लॉ विभागाच्या उद्घाटनासाठी येत असल्याबद्दल आम्हाला आनंद होतो आहे असे सांगितले आहे.
कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,लाॅ विभागाच्या संचालिका ॲड.डॉ.अंजली पाटील व टीम यासाठी कष्ट घेत आहेत.