आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे ॲंथे २०२४ लाँच ;राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा
अँथे एईएसएलची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा १९ ते २७ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन होणार आहे.
कोल्हापूर/प्रतिनिधी : ॲंथेच्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची १५ गौरवशाली वर्षे पूर्ण करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL), चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये राष्ट्रीय अग्रणी, अत्यंत अपेक्षित आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षेची नवीनतम आवृत्ती सुरू करण्याची घोषणा आज कोल्हापुरात केली.ॲंथे २०२४ लाँच करून विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पुढील द्रष्ट्यांचा शोध सुरू करण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
या लाँचिंगवेळी विनय कुमार पांडे, डेप्युटी डायरेक्टर, मनिष कुमार, ॲकॅडमी हेड इंजि., डॉ. रुपाली देशपांडे, ॲकॅडमी हेड मेडिकल, इम्रान खान, क्लस्टर हेड, अमित कुमार शर्मा, असि.डायरेक्टर, शरदचंद्र जोशी, कोल्हापूर ब्रॅंच मॅनेजर, कुमार चव्हाण, सांगली, ब्रॅंच मॅनेजर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विनय कुमार पांडे यांनी सांगितले की, ॲंथे २०२४ परीक्षा भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १९-१७ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने होणार आहे. यातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंतच्या शिष्यवृत्ती व्यतिरिक्त रोख पुरस्कारदेखील मिळणार आहेत.
सदर परीक्षा आकाश संस्थेच्या देशभरातील सर्व ३१५ हून अधिक केंद्रांवर २० आणि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत ऑफलाइन परीक्षा होणार आहेत, तर ऑनलाइन परीक्षा १९ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत केव्हाही देता येतील. यासाठी विद्यार्थी त्यांच्या सोयीचा एक तासाचा स्लॉट निवडू शकतात.या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ऑनलाइन परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाइन परीक्षेच्या सात दिवस आधी आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन परीक्षेसाठी २०० रुपये परीक्षा शुल्क आहे. १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी नोंदणी केल्यास विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्कात ५० टक्के सवलत मिळेल.ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाशच्या विस्तृत कोचिंग प्रोग्रामचा फायदा होईल. शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध,इयत्ता सातवी ते नववीमधील सर्वोत्कृष्ट १०० विद्यार्थ्यांना आणि इयत्ता अकरावी आणि बारावीतील सर्वोत्कृष्ट ५० विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार, तसेच पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर येथे पाच दिवसीय मोफत सहल जिंकण्याची संधी मिळणार आहे.आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड ही प्रवेशपरीक्षेची तयारी करून घेणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे.