Tuesday, October 22, 2024
Home ताज्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजिनिअरिंगची २०२४ मध्ये निकालाची परंपरा कायम

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजिनिअरिंगची २०२४ मध्ये निकालाची परंपरा कायम

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजिनिअरिंगची २०२४ मध्ये निकालाची परंपरा कायम

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. वेगवेगळ्या विभागातून २९ विद्यार्थांनी इंजिनिअरिंगच्या विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत ७० पैकी ७० गुण मिळवून, राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान या ही वर्षी पटकाविला आहे, तसेच सहा विषयाचा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेमध्ये विविध विभागातील मिळून एकूण ४३ विद्यार्थ्यांनी ९०% हुन अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. तृतीय वर्षातील विविध विभागातुन प्रथम क्रमांक सिद्धांत कर्नावट ९५.००%, द्वितीय क्रमांक निरंजन कुडाळकर ९४.३७%, व तृतीय क्रमांक अर्घ्य कोळेकर ९४.३२% गुण प्राप्त केले आहेत. द्वितीय वर्षामधील विविध विभागातुन प्रथम क्रमांक कु. कविता पुजारी ९६.२६%, द्वितीय क्रमांक कु. निर्झारा माणदे ९६.००% व तृतीय क्रमांक शार्मीन शेख ९५.०६.% गुण प्राप्त केले आहेत. प्रथम वर्षातून विविध विभागातुन प्रथम क्रमांक कु. मनाली पाटील ९५.१८%, द्वितीय क्रमांक कु. प्रणाली जाधव ९१.६५% आणि तृतीय क्रमांक भार्गव खंडाळकर ९१.४१% गुण प्राप्त केले आहेत. अशी माहिती पॉलिटेक्निक विभागाचे अकॅडमिक डीन प्रा. पी. एम पाटील यांनी दिली आहे.संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या (एमएसबीटीई) शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा निकाल १००% लागला असून त्यामध्ये ‘डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी’ प्रथम क्रमांक सुरेंद्र मगदूम ८१.००%, द्वितीय क्रमांक अजय भोकरे ८०.४०%, तृतीय क्रमांक सुरज माळी ८०.३३ गुण प्राप्त केले आहेत. डिप्लोमा इन ड्रेस डिझाईनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रथम क्रमांक कु. प्रणाली सांगळे ७६.००% द्वितीय क्रमांक कु. श्रद्धा शिंदे ७५.५० गुण प्राप्त केले आहेत अशी माहिती शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी दिले आहे.या निकालाबद्दल संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. या सोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि विभागप्रमुखाना देऊन सर्वांचे मनापासून कौतुक केले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments