Tuesday, October 22, 2024
Home ताज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारीत बदल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आज...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारीत बदल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आज जनतेला निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारीत बदल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आज जनतेला निवेदन

अर्ज करायला दोन महिन्याची मुदतवाढ ;३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार ;दरमाह १५०० रुपये १ जुलैपासूनच मिळणार

अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द ;रेशनकार्ड किंवा जन्मदाखला, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ग्राहय धरणार

५ एकर शेतीची अट वगळली ;वयाची मर्यादा २१ ते ६५ करण्यात आली

मुंबई दि. २ जुलै – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारीत बदलाबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जनतेला निवेदन केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज करण्याची मुदत ही यापूर्वी १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता ही मुदत २ महिन्याची ठेवण्यात येत असून ती ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार असून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दर माह १५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.                                         या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.या योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. शिवाय या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष होता त्याऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. अडीच लाखापर्यंत उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आहे. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असेही अजित पवार यांनी निवेदनातून राज्यातील जनतेला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments