Wednesday, May 1, 2024
Home ताज्या विचारांची लढाई नक्की जिंकू : संभाजीराजे छत्रपती

विचारांची लढाई नक्की जिंकू : संभाजीराजे छत्रपती

विचारांची लढाई नक्की जिंकू : संभाजीराजे छत्रपती

 

गडहिंग्लज/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना आदर्श मानून विद्यमान छत्रपती शाहू महाराजांनी आपले कार्य सुरु ठेवले आहे. सर्वसामान्य जनतेप्रति, शेतकऱ्यांप्रति
महाराजांना विशेष कणव आहे. समाजात जातीद्वेषाचे राजकारण सुरु आहे. त्याला थोपवायचे आहे. हा लढा विचारांचा आहे. समतेचे विचार पुढे नेणाऱ्या शाहू महाराजांच्या पाठीशी जनता आहे. त्यामुळे विचारांची लढाई नक्की जिंकू, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी गडहिंग्लज तालुक्यातील प्रचार दौऱ्यात व्यक्त केला.
महाविकास व इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ
संभाजीराजे छत्रपती जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘ गाव टू गाव’ प्रचार दौरा करत आहेत. आज
गडहिंग्लज तालुक्यातील भीमनगर साधना विद्यालय, गडहिंग्लज, अरळगुंडी,कडलगे, इदरगुच्ची,चंदनकुड, हलकर्णी, बसर्गे, खणदाळ, नांगनूर येथील भेटीप्रसंगी ते बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, गाव टू गाव प्रचार दौरा केल्यामुळे ग्रामस्थ खुलेपणाने बोलतात, आपले प्रश्न सांगतात. त्यामुळे लोकांच्या समस्या समजतात. येणाऱ्या काळात शाहू महाराज खासदार म्हणून हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतील. ही कामे करताना आम्ही तुमच्यासोबत आहोत. या भागातील जास्तीतजास्त प्रश्न मार्गी लावायचे आहेत.डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, भाजप सरकार हे भूलथापा मारणारे आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली जात आहे. या सरकारला सेलिब्रेटींच्या घरी जायला वेळ आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघायला वेळ नाही. चित्रीची उंची वाढविण्यासरखे तालुक्याचे प्रश्न जे देशपातळीवर सोडविले जाऊ शकतात, त्यासाठी आपल्या हक्काचा खासदार पाहिजे. शाहू छत्रपती खासदार झाले की त्यांच्याबरोबर संभाजीराजे छत्रपती हे दुसरे खासदार म्हणूनच या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय राहतील. त्यामुळे हात चिन्हावरच बटण मारा असे आवाहन केले.
दौऱ्याप्रसंगी अप्पी पाटील, गोपाळराव पाटील, शिवप्रसाद तेली, रामराज कुपेकर, अमर चव्हाण, सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, सोमनाथ आरबोळे, दिलीप माने, स्वराज्यचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, यांचेसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापुरात महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

कोल्हापुरात महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरात महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते...

महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन

महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार आणि पणतू राजे राजवर्धन कदमबांडे...

शाहू महाराजांच्या प्रचारार्थ आज गांधी मैदान येथे शरद पवार, उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांची शिव-शाहू निर्धार सभा

शाहू महाराजांच्या प्रचारार्थ आज गांधी मैदान येथे शरद पवार, उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांची शिव-शाहू निर्धार सभा महायुतीच्या विरोधात तोफा धडाडणार कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेचे इंडिया, महाविकास...

विकसित भारतासाठी भाजपला साथ दया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकसित भारतासाठी भाजपला साथ दया - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर/प्रतिनिधी : इंडिया आघाडी ही देशा विरोधात अजेंडा राबवत आहे पण भाजप लोकसभा निवडणूक देशाच्या विकासासाठी...

Recent Comments