Monday, April 29, 2024
Home ताज्या चौथ्या मजल्यावरुन गणपतीची मुर्ती खाली आणताना लिफ्टची वायर तुटल्याने एक जण ठार...

चौथ्या मजल्यावरुन गणपतीची मुर्ती खाली आणताना लिफ्टची वायर तुटल्याने एक जण ठार तर एक जखमी

चौथ्या मजल्यावरुन गणपतीची मुर्ती खाली आणताना लिफ्टची वायर तुटल्याने एक जण ठार तर एक जखमी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर-संत गोरा कुंभार वसाहत येथे लिफ्टची वायर तुटल्याने लिफ्ट मधून पडून भगवान नामदेव कांबळे (वय ४८ रा.विक्रमनगर ,मुळ गाव पासार्डे ता.करवीर )हे गणपतीची मुर्ती चौथ्या मजल्यावरुन खाली आणताना लिफ्टची वायर तुटल्याने लिफ्ट मधून खाली पडले असता त्यांना बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तर एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकित झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मयत भगवान कांबळे हा संत गोरा कुंभार येथे गेल्या दोन महिन्यापासून बाजीराव कुंभार यांच्या कडे हाता खाली काम करीत होता.आज सकाळी अकराच्या सुमारास चौथ्या मजल्यावरून गणपतीची मुर्ती खाली आणताना तो आणि गुहागर येथील कामास असलेला असे दोघे जण लिफ्ट मधून खाली येत असताना लिफ्टची वायर तुटल्याने ही दुर्घटना घडली.नातेवाईकांनी भगवान बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .भगवान पडेल ते काम करीत होता.तो विवाहित असून दोन मुले आहेत.एक मुलगी दहावीत शिकत असून मुलगा पहिलीत शिकत आहे.त्याला तीन भाऊ आणि एक बहिण आहे.त्यांना भजनाचा छंद होता ते स्वामी समर्थ भजनी मंडळात होते.त्याच्या अशा निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सीपीआर परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विकसित भारतासाठी भाजपला साथ दया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकसित भारतासाठी भाजपला साथ दया - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर/प्रतिनिधी : इंडिया आघाडी ही देशा विरोधात अजेंडा राबवत आहे पण भाजप लोकसभा निवडणूक देशाच्या विकासासाठी...

मोदींची हॅट्रिक दिल्लीत कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक भाजपाचे महासंपर्क अभियान

मोदींची हॅट्रिक दिल्लीत कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक भाजपाचे महासंपर्क अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते...

डॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार -इंडियन एज्युकेशन समिटमध्ये शैक्षणिक कार्याचा गौरव

डॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार -इंडियन एज्युकेशन समिटमध्ये शैक्षणिक कार्याचा गौरव कोल्हापूर/ प्रतिनिधी : डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील...

मोदींची हॅट्रिक दिल्लीत कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक भाजपाचे महासंपर्क अभियान

मोदींची हॅट्रिक दिल्लीत कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक भाजपाचे महासंपर्क अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते...

Recent Comments